गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयल यांच्या वतीने १ जुलै रोजी डॉक्टर्स डे, कृषी दिन व चार्टर्ड अकौंटंटस डेच्या औचित्याने समाजातील तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात लायन्सचे द्वितीय उपप्रांतपाल किरण खोराटे यांच्या हस्ते आयएमएचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. शैलेश ढभू, कष्टाळू व प्रगतशील शेतकरी शिवाजी कुराडे, प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट सुनील कुराडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला झोन चेअरमन रफिक पटेल, क्लबचे सचिव अभिजीत नाईकवाडे, कोऑर्डिनेटर शैलेंद्र कावणेकर तसेच क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयल तर्फे समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो, ही गौरवशाली परंपरा पुढे नेण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.