भक्तांनी लाभ घेण्याचे मंदिर सेवा संस्थानचे आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अल्प काळातच प्रती आदमापूर म्हणून प्रसिध्दीस येत असलेल्या रिंगणे मळा,गडहिंग्लज येथील श्री संत बाळुमामा व श्री हालसिध्दनाथ देवाचा 9 वा भंडारा महोत्सव प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याचे मंदिराच्या विश्वस्त समितीने नेटके नियोजन केले आहे.
सोमवार दिनांक 19 मे ते बुधवार दिनांक 21 मे पर्यंत रोज सायंकाळी 6 वाजता मेजर विक्रम जगताप यांचे "श्री संत बाळुमामा महात्म्य" या विषयावर प्रवचन होणार आहे.
गुरूवार दिनांक 22 मे रोजी प.पु. षट्स्थळब्रम्ही श्री गुरुसिध्देश्वर महास्वामीजी ,सुरगीश्वर मठ कसबा नुल यांच्या शुभहस्ते दुपारी 3 वाजता श्रींचा पालखी सोहळा व नगरप्रदक्षिणा व त्याच रात्री 8 वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आणि 9 वाजता मंदिरात श्री भगवान डोणे महाराज वाघापूर यांची भाकणुक होत आहे.
शुक्रवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 9.30 वाजता श्री दत्त मंदिर लोकार्पण, कलशारोहण आणि श्री विठ्ठल रखुमाई व श्री मुळे महाराज यांच्या मुर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मनिप्र जगद्गुरु श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी श्री दुरदुंडिश्वर सिध्द संस्थान मठ निडसोशी, प.पु. षट्स्थळब्रम्ही श्री गुरु सिध्देश्वर महास्वामीजी श्री सुरगीश्वर मठ कसबा नूल , श्री रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती परमपूज्य भगवानगिरी महाराज, श्री जडेयसिध्देश्वर आश्रम, बेलबाग मठ गडहिंग्लजचे मठाधिश प.पु. श्री महांत सिध्देश्वर महास्वामीजी आणि श्री किसन महाराज भडगाव यांच्या अमृत हस्ते आणि दिव्य सानिध्यात पार पडणार आहे. त्यानंतर महाप्रसाद असुन,सर्व सद्भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन श्री बाळुमामा व श्री हालसिध्दनाथ मंदिर देवस्थान सेवा संस्थानच्या विश्वस्त समितीने केले आहे.