Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हुनगिनहाळ येथे झालेल्या अपघातात डॉक्टर युवतीचा मृत्यू

डॉ.उमा जरळी

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
हुनगिनहाळ येथे झालेल्या अपघातात उमा मार्तंड जरळी (वय २६, राहणार मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) या डॉक्टर युवतीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टर उमा ह्या महागाव येथील संत गजानन महाराज रुग्णालयात मेडिकल ऑफिसर या पदावर तीन महिन्यापासून कार्यरत होत्या. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कामावर आपल्या गाडीवरून जाताना हुनगिनहाळ येथे झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील ,आई व भाऊ असा परिवार आहे. डॉक्टर उमा ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष मार्तंड जरळी यांच्या कन्या होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.