Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे. यावेळी सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्यासह इतर मान्यवर.         (छाया: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज( प्रतिनिधी) :
येथील शिवराज विद्या संकुलात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेच्या शिवराज महाविद्यालयाचा ५९ वा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वागत प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांनी केले. संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अशोक पाटील, अशोक येसरे, बी. एस. सावंत, वसंतराव धुरे, मारुतीराव घोरपडे आदींचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या जडणघडणीत योगदान दिल्याबद्दल अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, उपाध्यक्ष के.जी.पाटील, जे.वाय. बारदेस्कर, सचिव डॉ.अनिल कुराडे व अन्य मान्यवर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे. यावेळी उपस्थित प्राचार्य डॉ.एस.एम. कदम यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी.                        (छाया: मज्जिद किल्लेदार)

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे म्हणाले,  संस्थेने या भागातील ग्रामीण विद्यार्थी व समाजाशी ऋणानुबंध जपले आहे. या भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना घडविणारी आमची शिक्षण संस्था शैक्षणिक व सामाजिक कार्यातून नेहमीच योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्याची दिशा कशी असावी हे नव्या पिढीला कळावे आणि समाजाशी एकरूप होण्याचे कार्य व्हावे यासाठी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष जे.वाय. बारदेस्कर यांनी संस्थेच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी अशोक पाटील, अशोक येसरे, बी. एस. सावंत, वसंतराव धुरे,मारुतीराव घोरपडे आदींनी आपल्या मनोगतातून शिवराज महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. एम.के. सुतार, राजू मांडेकर, पापा चौगुले, श्री. नंदनवाडे गुरुजी, देवाप्पा तूपुरवाडकर, राजगोंडा पाटील, प्रा.सौ बिनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही.चौगुले, मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे, डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले. आभार डॉ. ए.बी.कुंभार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.