गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता,गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय व कोल्हापूर परिक्षेत्र विद्युत विज वितरण (एम.एस.ई.बी.) यांच्यात वेगवेगळ्या विषयासाठी सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राद्वारे प्रशिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सखोल ज्ञान मिळणार आहे.
या करारांतर्गत महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व महावितरणचे अधिकारी तंत्रज्ञ यांच्यातील परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, औद्योगिक सहली, महावितरणचा विविध उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग, प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.तसेच विद्यापीठ अभ्यासक्रम निर्मिती, समीक्षा करण्यासाठी शिक्षक व अभियंते सहभागी होण्याचे नियोजन केला आहे. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एच. सावंत व महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी करारावर स्वाक्षऱ्या करून प्रति एकमेकाकडे सुपूर्द केल्या.
यावेळी उप कार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच डी ताम्हणकर, आर.एच. पवार,एस.जी.जोशी, प्रा. एस.टी. मातले,प्रा.एम.बी.पाटील, प्रा.जी. एस. पाटील तसेच सांगली व कोल्हापूर परिक्षेत्र प्रशिक्षण केंद्राचे अभियंते, शिक्षक उपस्थित होते.