ग्रामपंचायतीकडून तातडीने नळपाणीपुरवठा सुरू ; अग्निशमन व पोलीस घटनास्थळी दाखल
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महागाव येथे गणेश विसर्जना दिवशी गॅस गळतीने सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच असतानाच आज रविवारी सायंकाळी सातच्या पावणे सातच्या सुमारास येथील पाच रस्ता परिसरात असणाऱ्या जानबा अर्दाळकर यांच्या कौलारू घरातील विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटने घराला आग लागल्याची घटना घडल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीने तातडीने नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी सुरू केले आहे. ग्रामस्थ आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. पाच रस्ता परिसरात मोठी गर्दी झाली असून धुराचे लोट दिसत आहेत. या दुर्घटनेत अर्दाळकर यांचे घरातील प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान, गडहिंग्लज नगरपालिकेचे अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.