Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रॅली, नामफलक अनावरण, प्रतिमा पूजन, गावातील चौकाला नाव देऊन आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

गडहिंग्लज तालुक्यात गावोगावी जयंती ; किल्ले सामानगड येथून आणली क्रांतीज्योत 


भडगाव, हिडदुग्गी, बसर्गे, खणदाळ, कवळीकट्टे, तेरणी येथील कार्यक्रमांना नेते बाळेश नाईक यांची उपस्थिती





गडहिंग्लज (प्रतिनिधी): आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती गडहिंग्लज तालुक्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावोगावी ग्रामपंचायत कार्यालये व समाज बांधवांच्या वतीने प्रतिमा पूजन व मोटरसायकल रॅलीने राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. किल्ले सामानगड येथून क्रांतीज्योत विविध गावच्या युवकांनी आणली.



नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख मारुती नाईक, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष गणपतराव पट्टणकुडी, उपाध्यक्ष सागर गुंडली, विक्रांत नाईक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिडदुग्गी, बसर्गे, खणदाळ कवळीकट्टी, तेरणी, भडगाव या ठिकाणी कार्यक्रम पार पडले. भडगाव, खणदाळ, कवळीकट्टी येथे नामपलकांचे अनावरण करण्यात आले.


भडगाव येथे नरवीर उमाजी नाईक चौक नामफलकाचे अनावरण 






भडगाव येथे नामफलकाचे अनावरण नेते बाळेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय जाधव, तानाजी मदने, संपत मदने, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष केंप्पान्ना कतिगार, माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. अर्चना  पट्टणकुडी, सदस्य विजय पट्टणकुडी, माजी पोलीस पाटील भीमराव पाटील, किरण नाईक, सागर पट्टणकुडी, संदीप पट्टणकुडी, राकेश चिलमी, महेश नाईक, प्रकाश वंटमुरी, केरबा पट्टणकुडी, शंकर चाळूगोळ, शंकर वंटमुरी, आप्पासाहेब चाळूगोळ, बाळू चाळूगोळ, सचिन पट्टणकुडी, विजय नाईक, अशोक जकापगोळ, चंद्रकांत पट्टणकुडी, मारुती नाईक, युवराज पट्टणकुडी, बसवराज चिलमी, दयानंद जकापगोळ, भैरू मूकनावर यांच्यासह  बेरडवाडी, समर्थनगर येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हिडदुग्गी ग्रामपंचायतीत प्रतिमापूजन  





हिडदुगी येथील ग्रामपंचायतीत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सरपंच संतोष कांबळे, उपसरपंच विक्रांत नाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायण माईनकट्टे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र कानडे, रमेश नाईक, बाबुराव नाईक, आनंद नाईक, नारायण रेडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दरम्यान, हिडदुग्गी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे समाजाचे नेते बाळेश नाईक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गणपतराव पट्टणकुडी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.



खणदाळ येथे रॅली, प्रतिमापूजन, नामफलक अनावरण 




खणदाळ येथे प्रतिमा पूजनानंतर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. दरम्यान, येथील युवकांनी किल्ले सामानगड येथून क्रांतीज्योत आणली. त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाबू घस्ती, माजी सरपंच रवी यरकदावर, मारुती घस्ती, नागाप्पा घस्ती, सागर घस्ती, बसवराज लाक्यानावर, पिंटू लक्यानावर, लक्ष्मण लक्यानावर, शिवराज कुरणी, बाळगोंडा लक्यानावर, श्यामराव लक्यानावर, सुनील घस्ती, आकाश लक्यानावर, एकनाथ घस्ती, विकास घस्ती, सोमनाथ नाईक, काशिनाथ नाईक, सोमनाथ घस्ती उपस्थित होते.


बसर्गेत प्रतिमापूजन ; मान्यवरांचा सत्कार






बसर्गे येथे किल्ले सामानगड येथून आणलेल्या क्रांती ज्योतीचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रतिमापूजन झाले. यावेळी सरपंच भारती रायमाने, उपसरपंच महेश येणेचंवडीकर, पोलीस पाटील भागोजी कागीनकर, सोसायटीचे चेअरमन वसंत चौगुले, ग्रामपंचायत सदस्य शोभा थोरात, सागर शिंदे, आनंदा नांगनुरे, वीरपाक्ष गुळाणावर, महेश नाईक, राहुल नाईक, कुमार नाईक, कांचन घस्ती, पांडुरंग नाईक, दत्ता नाईक, सुरेंद्र नाईक, ऋषिकेश नाईक, ओमकार नाईक, प्रकाश नाईक, परशराम नाईक,  प्रकाश मायाप्पा नाईक, राहुल आनंद नाईक, दिगंबर पाटील, बाळू नाईक, पुंडलिक नाईक, अनिल नाईक, सार्थक नाईक, अनिकेत नाईक, संस्कृती नाईक, तनुजा नाईक, मानसी नाईक, स्नेहल नाईक, प्रणाली नाईक, प्रज्वल नाईक, अमोल नाईक,आदित्य नाईक, आराध्या नाईक यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.


कवळीकट्टी येथे प्रतिमापूजन, नामफलक अनावरण 






कवळीकट्टी येथे ग्रामपंचायतीत प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर  नामफलकाचे अनावरण समाजाचे नेते बाळेश यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच आनंदा पाटील, उपसरपंच किरण पाटील, पोलीस पाटील गंगाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य मलिक तेरणी, सेवा संस्थेचे चेअरमन विक्रम पाटील, माजी सरपंच शिवाजी पाटील, मारुती तेरणी, विठ्ठल गुरव, महादेव पाटील, परशराम  चव्हाण, मारुती बुध्याळे, मारुती तेरणी, विनायक बुध्याळे, परशराम इरगार, यल्लाप्पा तेरणी, पिराजी हट्टी, संतोष गुरव, प्रभाकर चिगरी, विठ्ठल चिगरी, मारुती इरगार, सोनाबाई इरगार, राजश्री धोडकिनी, संगीता तेरणी, कमल तेरणी, लक्ष्मण नाईक, विजव्वा चिगरी, लकव्वा हट्टी, महादेवी तेरणी,  यांच्या समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.


तेरणीत समाज बांधवांच्या वतीने प्रतिमापूजन, रॅली





तेरणी येथे प्रतिमा पूजन समाजाचे नेते बाळेश नाईक यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी येथील युवकांनी किल्ले सामानगड येथून क्रांतीज्योत आणली.  यावेळी सरपंच रमेश पुजेरी, ग्रामपंचायत सदस्य नागराज पाटील, भूषणबाबू इंगवले, शिवाजी नाईक ( मास्तरगोळ ), अर्जुन नाईक, राजू नाईक, अण्णाप्पा घस्ती, रामा कतीगार, गणपती नाईक, यलाप्पा नाईक, लगमा नाईक, करनाईक नाईक, प्रदीप नाईक, लक्ष्मण नाईक, युवराज नाईक, बाळू क्यासापनट्टी, करवीर क्यासापनट्टी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


तेरणी ग्रामपंचायतीत प्रतिमापूजन  




दरम्यान, ग्रामपंचायतीत प्रतिमापूजन सरपंच रमेश पुजेरी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य करवीर उथळे, मोसीम मुल्ला, अर्जुन कांबळे, नागराज पाटील, सुरेश कतिगार, बाळू नरेवाडी, रवींद्र नाईक, रामा कतिगार, ग्रामपंचायत अधिकारी पी. बी. रावण,  ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश भोई, करवीर भोई, सिद्धाप्पा धनगर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.