गडहिंग्लज (प्रतिनिधी): नूल (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. स्वप्निल चव्हाण यांची केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्ट्रीय वैद्यकीय सहाय्यता निधीचे नोडल ऑफीसर व कौन्सिलर म्हणून नियुक्ती झाली आहे. या निवडीचे पत्र केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण व आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी सुपुर्द केले.
कॅन्सर, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, जॉईंट रिप्लेसमेंट, लिव्हर व किडनी ट्रान्सप्लांट, रस्त्यांवरील अपघात, अपंगत्व, बालरोग आदी मुख्य आजारांवर डॉ. चव्हाण हे नोडल ऑफिसर व कौन्सिलर म्हणून काम पाहणार आहेत. या कामासाठी डॉ. चव्हाण यांना खासदार धैर्यशील माने, राज्याचे आरोग्य व पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे सहकार्य लाभले.