गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. जीवन पाटील यांचा सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाने विविध प्रकारच्या 700 हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून रुग्णांना चांगली सेवा दिल्याबद्दल महाराष्ट्र आरोग्य विभागाने नुकतेच या रुग्णालयाला राज्यात अव्वल क्रमांक देत गौरव केला होता. यामध्ये येथील डॉ. जीवन महादेव पाटील यांचे योगदान देखील महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांना सेवा पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.