Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी- हत्तरगी रस्त्यावरील अपघातात हलकर्णीच्या तरुणाचा मृत्यू


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
तेरणी- हत्तरगी रस्त्यावर झालेल्या अपघातात हलकर्णी (तालुका गडहिंग्लज) येथील तरुणाचा मृत्यू झाला. इम्तियाज कुतुबुद्दीन मकानदार (वय वर्ष 40) असे या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे. हा अपघात सकाळी दहा वाजता झाला.

अपघातातील मयत इम्तियाज हे आपला भाचा शोएब यांच्यासह बुलेट गाडीवरून येत होते. दरम्यान तेरणी- हत्तरगी रस्त्याच्या वळणावर हा अपघात घडला. इम्तियाज यांच्या डोक्याला जबर मार बसला होता.

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्ना शिखरे व चालक पुंडलिक येणेचवंडी हे 108 रुग्णवाहिकेतून बेळगाव येथे प्रसूतीसाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल करून हत्तरगी - तेरणी मार्गे परत येत होते. यादरम्यान त्यांना या रस्त्यावर तेरणी हद्दीत अपघात झाल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने इम्तियाज यांना याच रुग्णवाहिकेतून गडहिंग्लज येथील रुग्णालयात हलविले. मात्र इम्तियाज यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास हवालदार कांबळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.