Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दीपोत्सवाने गडहिंग्लजमधील श्री.महालक्ष्मी मंदिर उजळले

                 (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे दरवर्षी महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात येतो. काल मंगळवारी हा दीपोत्सव संपन्न झाला.   


या दीपोत्सवाचा प्रारंभ माजी खासदार राजू शेट्टी, गडहिंग्लजचे  पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राजेंद्र तारळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्यासह महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

दीपोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यानिमित्त महालक्ष्मी देवीची देखील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. मंदिर परिसरात प्रज्वलित करण्यात आलेल्या दिव्यांमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. या दीपोत्सवात भाविकांनी सहभाग घेत मंदिरात दिवे प्रज्वलित केले.

दीपोत्सवाची छायाचित्रकार मज्जिद किल्लेदार यांनी टिपलेली छायाचित्रे 👇 पहा 

















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.