कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा
कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना नेते व आमदार सुनील प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत गडहिंग्लज येथे दिनांक २ जून रोजी शाहू सभागृह येथे सायंकाळी चार वाजता शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली.
या मेळाव्याला संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, उपनेत्या जान्हवी सावंत उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले आहे.