गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. राज्यस्तरीय खेळाडू कु. ऋतुजा भम्मनगोळ हिच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
भडगाव पोलीस पाटील उदय पुजारी यांच्याहस्ते व गडहिंग्लज अर्बन बँकेचे संचालक सुभाष पुजारी यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करणेत आले. उदय पुजारी, राजेंद्र तारळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाचे वर्णन केले. यावेळी बाळ पोटे पाटील, अजित भम्मनगोळ, सागर भम्मनगोळ, विश्वनाथ खोत, सुधारक गोरूले, शिवानंद मुसळे, डॉ. संतोष पेडणेकर, एम.एन कांबळे, आर.बी भोसले गडहिंग्लजकर, अर्बन बँक संचालक प्रा. रमेश पाटील उपस्थित होते.
दरम्यान, भारत सरकारने ३०० रुपयांचे नाणे जाहिर करण्याचे निर्णय घेतले व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी विशेष निधी देवून मोठा विकास केला आहे. या निर्णयाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष प्रतिम कापसे यांनी या कार्यक्रमात आभार व्यक्त केले.