Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यात 3 एप्रिल पर्यंत मनाई आदेश जारी



कोल्हापूर:  जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 22 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.

            



हा हुकूम सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.