Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नोंदणीकृत वाहनांना HSRP बसवण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ



कोल्हापूर : शासनाकडून दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापी सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसवण्यासाठी 30 जून पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.




सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्याकरीता M/s.Rosemerta Safety Systems Ltd या उत्पादक संस्थेची नेमणूक केलेली आहे. या उत्पादक संस्थेने कोल्हापूर जिल्ह्याकरीता एकूण 29 अधिकृत फिटमेंट सेंटर्सची नियुक्त केली आहे. वाहनधारकांनी https://transport.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर नोंदणी करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईटमेंट घेऊन वाहनांवर HSRP बसवण्याची कार्यवाही करावी.



अधिकृत फिटमेंट सेंटर्सची (FC) कडून वाहनांवर बसवण्यात आलेले HSRP हेच केवळ वैध मानले जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्ययावत केले जाईल. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट, इत्यादी वाहन संदर्भातील कामे वाहनांना HSRP बसविल्याचे प्रमाणिकरण केल्यानंतरच करण्यात येतील, याबाबतची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.


HSRP संचासह बसविण्याचे शुल्क (Fitment Charges) GST वगळून खालीलप्रमाणे आहेत-


दुचाकी आणि ट्रॅक्टर - 450 रुपये, तीनचाकी - 500 रुपये व 1 व 2 मधील वगळून इतर सर्व वाहने – 745 रुपये याप्रमाणे राहील, जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी खालील सूचनांनुसार वाहनांना HSRP बसविण्याची कार्यवाही करावी. अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.