सर्वाधिक मानधन असलेल्या कंपनीत ४८ विद्यार्थ्यांची निवड
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात कॅम्पस मुलाखतीतून सर्वाधिक ६४८ विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळाल्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बारा कंपन्यांनी कॉलेजमध्ये पूल कॅम्पस घेत सर्व निकषात सरस ठरलेल्या या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आत्मनिर्भर बनविला असून या पुढेही सर्वाधिक नामांकित कंपनीसाठी मुलाखतीचे आयोजन करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीतून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती प्राचार्या प्रा.आर.एस.पाटील यांनी दिली.
कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी या हेतूने एसजीएम शिक्षण समूहातील ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट विभाग नेहमीच कार्यरत असते. दरवर्षी प्रमाणे यावेळीही विविध कंपन्यांचे पूल कॅम्पस आयोजित करण्यात आले. जानेवारी पासून सुमारे बारा कंपन्यांनी संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये मुलाखती घेतल्या. यामध्ये कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे १२२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामधून कंपनीच्या मुलाखतीतून ६४८ विद्यार्थ्यांना नोकरी च्या ऑफर देण्यात आल्या. ऑफर मिळालेल्या ६४८ विद्यार्थ्यांपैकी २१८ विद्यार्थी हे संत गजानन महाराज पॉलिटेक्निक मधील असून उर्वरित ४३० विद्यार्थी हे इतर पॉलिटेक्निक व सहभागी कॉलेज चे आहेत सर्वाधिक २.८४ लक्ष वार्षिक मानधन असलेल्या नेक्स्टीयर ऑटोमोटिव्ह प्रा.लि. कंपनीमध्ये ४८ विद्यार्थ्यांची निवड झाली. तर २.४ लक्ष वार्षिक मानधन असलेल्या कमिन्स इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनीमध्ये सर्वाधिक १३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सहभागी कंपनी आणि निवड झालेली विद्यार्थी संख्या -
बजाज ऑटो लिमिटेड (४०), कमिन्स इंडिया लि. (१३५), केएसपीजी ऑटोमोटिव्ह प्रा.लि.(२९), एसकेएचएम ऑटोमोटिव्ह प्रा.लि.( ७४), टाटा मोटर्स लिमिटेड (५८), ब्रेम्बो ब्रेक इंडिया प्रा. लि. (१२७), नेक्स्टीयर ऑटोमोटिव्ह प्रा.लि.(४८), बॉश चॅसीस सिस्टीम इंडिया प्रा. लि.(१४), थर्माक्स चॅनेल पार्टनर (०५), ओविन्स कॉर्निंग इंडिया प्रा. लि. (४८), जॉन डियर इंडिया प्रा. लि. (४६), लार्सन अन्ड टरबो प्रा. लि. (२४) शिक्षण समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख उत्कृष्ट शिक्षण मिळावा याकडे नेहमी प्रामाणिक प्रयत्न केला जातो. पण शिक्षणासोबत चांगला रोजगार उपलब्ध व्हावा याकडेही आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करीत यशाची परंपरा राखू असा विश्वास संस्थाध्यक्ष ॲड. डॉ. अण्णासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केला.
याकामी संस्था सचिव ॲड.बाळासाहेब चव्हाण,विश्वस्त डॉ.यशवंत चव्हाण, डॉ.संजय चव्हाण, डॉ.प्रतिभा चव्हाण, डॉ.सुरेखा चव्हाण, रजिस्ट्रार शिरीष गणाचार्य, प्राचार्या प्रा.रोहिणी पाटील, ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट विभागप्रमुख संतोष गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तर अकॅडमिक समन्वयक प्रा.सुरज चौगुले, ऑफिस सुपरीटेंडेंट अंकुश सावंत, आय. टी. प्रमुख निलेश करडे, विभागप्रमुख प्रा. विक्रम मोहिते, प्रा. मंजुनाथ पाटील, प्रा.प्रदीप लोंढे, प्रा.निलजीत माळी, प्रा.सचिन मोर्ती, प्रा. स्वप्नील मनगुळे, प्रा. प्रा. गुरुनाथ बिरंगड्डी ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट समन्वयक प्रा.ए.आय.मुल्ला, प्रा.अमित डंगी, प्रा.शरद लाटकर, प्रा.श्रीनाथ रावण, प्रा.संजीविनी गाडवी, प्रा.सानिया पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.