हरळी खुर्द येथे हिरण्यकेशी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
तब्बल २२ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्यार्थ्याचे शिक्षण व नोकरी नंतर सामाजिक जीवन जगत असताना सुखी संसाराचा समतोल राखला पाहिजे. माध्यमिक शिक्षण घेत असताना शिक्षकांनी केलेले संस्कार भविष्यात उपयोगी येत असतात. या केलेल्या संस्कारातून भविष्यात एक जबाबदार नागरिक घडत असतो .म्हणून शिक्षकांचे संस्कार महत्त्वाचे आहेत, असे मत मुख्याध्यापक शशिकांत नलावडे यांनी व्यक्त केले .ते हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द (ता.गडहिंग्लज) येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रशालेत २००२-०३ या वर्षातील दहावीत शिक्षण घेणारे विद्यार्थी तब्बल २२ वर्षांनी विद्यार्थी एकत्र आले होते. यावेळी शिकवलेल्या सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्पाची उधळण करत स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व शिक्षकांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. युवराज कागवाडे, दत्तात्रय पाटील, दयानंद कुंभार , दिपाली कुंभार,राधिका लोंढे,प्रमोद मोर्ती या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.अर्चना सावरे व माधुरी बागडी यांनी कविता वाचन केले.स्नेहलता शिंदे व राजश्री धुळाज यांनी वर्ग तासिकेत आपला सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक बाळासाहेब कुपटे , सुनंदा बोलके रमेश कांबळे, गजानन वष्ट,महादेव जाधव,लिना गोवेस,रेखा कुडची ,अनिल कांबळे,अनिल कुंभार, पांडुरंग गोंदुकूपे, शिवाजी कुंभार, विजय कांबळे ,अरुण कुंभार यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधिका लोंढे , प्रमोद मोर्ती, प्रास्ताविक साधना तोडकर व आभार गणेश बुरुड यांनी मानले.