भूषणबाबू इंगवले सौ. मालुताई जाधव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील श्री जय भारत सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या चेअरमनपदी भूषणबाबू करवीर इंगवले तर व्हाईस चेअरमन पदी सौ. मालुताई विठ्ठल जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली.
चेअरमन पदासाठी श्री. इंगवले यांचे नाव दूंडाप्पा नरेवाडी यांनी सुचविले व करवीर मगदूम यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी सौ. जाधव यांचे नाव रवींद्र इंगवले यांनी सुचविले व केदारी फगरे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी नूतन संचालक दूंडाप्पा नरेवाडी, केदारी बाळाप्पा फगरे, बाळासाहेब निंबाळकर, करवीर मगदूम, गुलाब मुल्ला, सौ शांता मगदूम यांच्यासह सुकाणू समिती सदस्य उत्तम नरेवाडी, राजू इंगवले, महादेव इंगवले, मारुती मांगले उपस्थित होते.