गडहिंग्लज (प्रतिनिधी): निलजी येथील विद्यामंदिरला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शुक्रवार (दि. 24 )पासून विविध उपक्रम राबवून शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
नूल मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर, गटशिक्षणाधिकारी एन. बी. हालबागोळ, लक्ष्मण पाच्छापुरे हे उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी सकाळी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, हळदीकुंकू व महिला प्रबोधन कार्यक्रम, सायंकाळी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवार दि. 25 रोजी ध्वजारोहण, ग्रंथ दिंडी, ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास परिसरातील शिक्षक, शिक्षणप्रेमी व मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.