गडहिंग्लज (प्रतिनिधी): औरनाळ येथील पार्वती हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिन 15 सप्टेंबर अभियंता दिन व ग्रंथप्रदर्शन असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यु.पी. सावंत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक व हिंदी शिक्षक जी.एच. गुरव व जागृती प्रशालेचे प्राचार्य एस.एन.तांबे, अभियंता धनाजी कल्याणकर व ग्रंथपाल प्रशांत कोरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जी.आर. पाटील यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. व्ही.आर. रेपाळ यांनी केले. याप्रसंगी अभियंता दिनानिमित्त कुमारी प्रतीक्षा संभाजी, सानवी माने, श्रेया भोसले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच हिंदी दिनानिमित्य आदित्य माने, वैष्णवी राजगिरे, रचना तोडकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जी.एच. गुरव यांनी हिंदी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. आणि हिंदी भाषा हिंदी भाषेचे स्थान आणि महत्त्व हेही विद्यार्थ्यांना पटवून दिले. ग्रंथपाल प्रशांत कोरे यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच ग्रंथ हे मानवी जीवनात किती उपयुक्त आहेत हेही सांगितले. इंजिनीयर धनाजी कल्याणकर यांनी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातील काही घटनांचा आढावा घेतला आणि भवितव्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले.
हसन मुश्रीफ फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल एस.एन.तांबे यांचा सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक यु.पी. सावंत यांनी या तीनही दिनांचे महत्त्व मानवी जीवनात किती मोठा आहे हे पटवून दिले. सूत्रसंचालन रसिका कांबळे यांनी केले. आभार एम.बी. कासार यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी ए.आर. मोकाशी, उदय पोवार, अनिल पोवार यांच्यासह सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)