गडहिंग्लज (प्रतिनिधी): आयोध्या टॉवर,दाभोळकर कॉर्नर कोल्हापुर येथे जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय शासकीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात जागृती हायस्कूल, गडहिंग्लजची बुद्धिबळपटू कु. केतकी सचिन माने हिने कांस्यपदक मिळविले. तिची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कितुरकर, सचिव ॲड. बी.जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी व सर्व संचालक यांची प्रेरणा तर मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, उपमुख्याध्यापक बी. जी. कुंभार यांचे प्रोत्साहन मिळाले. तिला क्रीडाशिक्षक संपत सावंत, सचिन मगदूम, प्रकाश हरकारे, प्रा. शिवानी पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. कुमारी केतकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

