Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कुस्ती हा मातीतला रांगडा मर्दानी खेळ : महेश कोरी

गडहिंग्लज शालेय कुस्ती स्पर्धा;  १३८ मल्लांचा सहभाग


३१ विजेत्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): कुस्ती हा मातीतला रांगडा मर्दानी खेळ असून तो भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा आणि शौर्याचा अविभाज्य भाग आहे. ही शालेय शासकीय स्पर्धा केवळ ताकद मोजण्याची नसून शिस्त, संयम,परिश्रम,आत्मविश्वास व खिळाडूवृत्ती दाखविण्याची संधी आहे. जिंकणे- हारणे हा जरी खेळाचा भाग असला तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आणि खेळाचा आदर करणे हेच खरे यश असल्याचे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी यांनी शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले. प्राचार्य डॉ. संजयकुमार इंगळे अध्यक्षस्थानी होते.



स्वागत स्पर्धा प्रमुख प्रा. देवदत्त पाटील यांनी केले. क्रीडा समन्वयक संपत सावंत यांनी प्रास्ताविक केले. १४,१७ व १९ वर्षाखालील विविध वजनी गटात १३८ खेळाडूंनी सहभाग घेतला. ए.डी शिंदे कॉलेज, भडगावच्या प्रशस्त सभागृहात  मॅटवरील कुस्ती स्पर्धेत ३१ खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. यावेळी विनोद शिंत्रे, पै. शंकर कुरळे, पै. तात्यासो पाटील, पै. मधुकर पाटील, पै.बाजीराव कदम, पै.सागर शिंदे, पै. रवींद्र डोंगरे, पै. प्रमोद खांडेकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संजयकुमार इंगळे यांनी या खेळात डावपेच, चपळता व निर्णय क्षमता महत्त्वाची असल्याचे सांगितले. स्पर्धेचे परीक्षण रवींद्र डोंगरे, प्रमोद खांडेकर, बाजीराव कदम, सागर शिंदे यांनी केले.



स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-(प्रथम क्रमांक) 


१४ वर्षे मुले -३५ किलो प्रथमेश पाटील (नूल) ३८ किलो सत्यजित नंदनवाडे (नंदनवाड) ४१ किलो मंदार तेलवेकर (जागृती ) ४४ किलो आदित्य शिंत्रे (नंदनवाड) ४८ किलो शिवराज व्हन्नोळी (बसर्गे), ५७ किलो आदित्य चव्हाण (जागृती) ६२ किलो हुसेन नाईकवाडे (नूल)

१४ वर्षे मुली- ३६ किलो कुमारी मानवी येणेचीवंदीकर (नंदनवाड), ४२ किलो कुमारी श्रावणी बिरंजे (नंदनवाड)५० किलो समृद्धी पाच्छे (हनिमनाळ) ५८ किलो कुमारी श्रावणी रायागोर (बसर्गे )६२ किलो कुमारी पूर्वा कदम (हनिमनाळ)

१७ वर्षे मुले-यशराज सोनवणे (जागृती) ४८ किलो अथर्व पाटील (जागृती) ५१ किलो प्रशांत गुरव (नंदनवाड)५५ किलो प्रवीण पाटील (जागृती) ६० किलो अनिकेत नाईक (नंदनवाड) ६५ किलो समर्थ शेलार (एम. आर. गड) ७१ किलो विश्वजीत मातले (संभाजीराव माने गड) ८० किलो तनिष्क आंबी (गड. हाय) ९२ किलो विराज गुरव (कडगाव) ११० किलो सार्थक पावले (जागृती)

१७ वर्षाखालील मुली-४० किलो कुमारी श्रेया सावेकर( नंदनवाड )४६ किलो कुमारी श्रेया बिरंजे (नंदनवाड ), ४९किलो कुमारी सानवी कापसे (हनिमनाळ) ५३ किलो कुमारी नम्रता झळके( नंदनवाड ) ५७ किलो कुमारी सेजल पाटील (जागृती) ६५ किलो कुमारी श्रावणी मुरगळी (जागृती).१९ वर्षाखालील मुले-

५७ किलो अथर्व पाटील (कडगाव) ६१ किलो पार्थ गौड (नेसरी) ६३किलो कारसिद्ध रानगे (नेसरी)



स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. देवदत्त पाटील, सागर शिंदे, प्रकाश हरकारे, सुनील रेडेकर, बाळासाहेब खरात, प्रा. जयवंत पाटील, देवदत्त कांबळे, अमित नंद्यानावर, रावसाहेब पडदाळे, सुभाष तिप्पे, राजेंद्र शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संपत सावंत यांनी तर शंकर कुरळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.