Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लायन्स क्लबची विभागीय बैठक संपन्न ; विविध विषयांवर चर्चा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट ३२३४ D१, रिजन ४, झोन ४ ची झोन ॲडवाहीझरी बैठक नुकतीच संपन्न झाली.



यावेळी झोन चेअरमन माजी प्राचार्य  रफिक पटेल, द्वितीय उपप्रांतपाल डॉ. किरण खोराटे, अण्णासाहेब गळतगे, माजी प्रांतपाल सुनील सुतार तसेच लायन्स क्लब जयसिंगपूर सिटीचे यश मानधाना, गडहिंग्लज लायन्स क्लबचे विनायक गळतगे, गडहिंग्लज रॉयलचे अध्यक्ष कौसर मुलाणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.



अत्यंत खेळीमेळीत झालेल्या या बैठकीमध्ये  प्रत्येक क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पर्मनंट प्रोजेक्ट साठी येत असलेल्या अडचणीची माहिती दिली, तसेच प्रत्येक क्लब मार्फत चांगल्या सेवा कार्य कसे घेता येतील यावर चर्चा झाली. तसेच प्रत्येकांनी आपल्या क्लबची सेवाकार्य, प्रशासकीय रिपोर्ट वेळेत सादर करणे गरजेचे आहे.


यावेळी सर्व सदस्यांनी सभेत आपले विचार मांडून आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर यावर योग्य असे शंका निरसन व मार्गदर्शन अण्णासाहेब गळतगे, सुनील सुतार, डॉ. किरण खोराटे, झोन चेअरमन रफिक पटेल  यांनी केले. यासाठी सुरेश कोळकी, शैलेंद्र कावनेकर, अमित कुलकर्णी, डॉ. कल्याणी खोराटे, डॉ.राजश्री पट्टनशेट्टी, आलोक तेलवेकर, अभिजीत नाईकवाडे व जितेंद्र शाह यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.