Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण



कोल्हापूर :  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी पात्र युवक-युवतींसाठी दिनांक 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत SSB  कोर्स क्र. 62 साठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.


उमेदवारांनी मुलाखतीला जाताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-62 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन जावे. एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला/ मुलाखतीस जाताना घेऊन जाणे आवश्यक आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेड मध्ये पास झालेले व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.


अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल training.petenashik@gmail.com  व 0253-2451032 या दूरध्वनी किंवा 9156073306 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.