आजरा (हसन तकीलदार) : व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व्यंकटराव शिक्षण संकुलाच्या नवीन बोधचिन्ह फलकाचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या बोधचिन्हाच्या अर्थाचे विश्लेषण शिवाजी पारळे व पी. व्ही. पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस.पी.कांबळे , सचिव अभिषेक शिंपी, संचालक पांडुरंग जाधव, कृष्णा पटेकर ,सुधीर जाधव सचिन शिंपी तसेच आनंदराव कुंभार, रवी केळकर, सदाशिव डेळेकर , बाबाजी नाईक , सिनिअर कॉलेजचे प्र. प्राचार्य पन्हाळकर ,प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार, प्राथमिक चे मुख्याध्यापक आर. व्ही.देसाई, व्यंकटराव शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक, हितचिंतक, विद्यार्थी आणि आजरा नगरीतील नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांच्या संकल्पनेतून शाळा व परिसर तसेच शाळेतील, तहसील कार्यालय येथील शासकीय ध्वजारोहण व्हिडिओ रिल स्पर्धा, घोषवाक्य , पोस्टर व फलक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम कलाशिक्षक कृष्णा दावणे व एस.एम. पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने राबवून त्यातील उत्कृष्ट जवळजवळ 40 घोषवाक्य फलक व पोस्टर यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यामार्फत आजरा तहसील कार्यालयासमोरील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्यात आले. स्वच्छ आजरा सुंदर आजरा, व्यसनाचे दुष्परिणाम, कचऱ्याचे निर्मूलन, मोबाईलचा अति वापर आणि दुष्परिणाम, पर्यावरण रक्षण ही आमची जबाबदारी, प्लास्टिक बंदी इत्यादी विषयावरील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे उपस्थित आजरा तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, पीएसआय नागेश यमगर, आजरा नगरीतील जेष्ठ राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक पालक आजरा शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी यांनी पाहिली व सर्व बाल चित्रकार व उपक्रमशील व्यंकटराव शाळेचे कौतुक केले. या अनोख्या उपक्रमामुळे शासकीय ध्वजारोहणाचे प्रांगण सामाजिक प्रश्नांवर आधारित रंगीबेरंगी चित्रानी व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या उठावदार रंगाच्या युनिफॉर्ममुळे संपूर्ण परिसर रंग मय झाले होते.
एनसीसी ऑफिसर एम. एस. पाटील यांच्या एनसीसी युनिफॉर्म मधील संचालन हे देखील आकर्षक व शिस्तबद्ध होते ळ. कला झंकार व संस्कृतिक प्रमुख पी.व्ही. पाटील, डी. आर.पाटील, डेळेकर यांच्या उत्कृष्ट परिपाठ नियोजनाने कार्यक्रम उठावदार झाला.