विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घडवले कलागुणांचे दर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हलकर्णी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाणिक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर विविध कलागुण सादर केले.
ग्रामपंचायत हलकर्णी येथील ध्वजारोहण सरपंच सौ. योगिता सगांज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तलाठी वैजनाथ मुंगारे, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गाव चावडी येथील ध्वजारोहण मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनराळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी. कोतवाल शंकर भोसले, गोपाल बिद्रेवाडी उपस्थित होते. नेहरू चौक व वीरशैव बँकेचे ध्वजारोहण संचालिका श्वेताताई हत्तरकी यांच्या हस्ते तर प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र ध्वजारोहण प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ नीलिमा धबाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ विकास बिसनाई , सुपरवायझर बाळासाहेब कुंभार, यांच्यासह आरोग्य सेवक आरोग्य सेविका आशा वर्कर उपस्थित होते. उर्दू विद्यामंदिर ध्वजारोहण उपसरपंच सलीम यमकनमर्डी यांनी केले. बी. एम. टोणपी विद्यालयातील ध्वजारोहण डॉ किशोर मेह्त्री यांनी केले. एच. बी. इंग्लिश मेडियम शाळेतील ध्वजारोहण सुभाष मणिकेरी यांनी केले. यावेळी आय. बी. पाटील, चेअरमन चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक अल्बर्ट क्रुझ उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या कार्यालय मुख्य चौकातील ध्वजारोहण हाजी लायकअली मालदार यांनी केले. जीवन विद्यामंदिरचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका वर्षा बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यामंदिर गांधीनगर येथील ध्वजारोहण दस्तगीर कादरभाई यांच्या हस्ते करण्यात आले. बी.एम. टोणपी बसर्गे येथील ध्वजारोहण शाळेचे विद्यार्थी सोजल टोणपी सीमा सुरक्षा दल यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक पी.एच.वाके, आर. ए चिकबसर्गे विद्यार्थी उपस्थित होते. आजी माजी सैनिक संघटना ध्वजारोहण सेवानिवृत्त हवालदार मलिकजान यमकनमर्डी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य चौकामध्ये रिमझिम पावसात बी एम टोणपीच्या विद्यार्थ्याने देशभक्ती गीतावर नृत्य करून सगळ्यांची मने जिंकली. गांधीनगर शाळेच्या विद्यार्थ्यांची वेशभूषा व एच. बी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर नृत्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. जीवन विद्या मंदिरच्या चिमुकल्यांचे झांज पथक व देशभक्तीच्या कवायत नृत्याने कौतुकाची थाप मिळवली.