गडहिंग्लज (प्रतिनिधी ) : येथील साधना प्रशालेत 13 ते 15 ऑगस्ट रोजी 'हर घर तिरंगा' अभियान उत्साहात पार पडले.
१३ ऑगस्ट रोजी प्राचार्य आय.पी. कुटिन्हो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, दि. १४ ऑगस्ट रोजी पर्यवेक्षक ए. जे. बारदेस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर १५ ऑगस्ट रोजी साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण ळ करण्यात आले . प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे, देशभक्ती गीतावर आधारित कवायत सादर केले. एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी कवायत संचलन केले . सदर कार्यक्रमादरम्यान एनसीसी विभागाचे प्रमुख विनय नाईक यांची मेजरपदी बढती झालेबद्दल संस्था अध्यक्ष श्री. गुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . त्यानंतर वीरपत्नी श्रीमती वैशाली प्रभाकर माने, सुभेदार नागेश भोसले, सर्जेराव शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रशालेची माजी विद्यार्थिनी संयमी पाटील, नितेश कांबळे यांचेही यशाबद्दल कौतुक करण्यात आले.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पोलीस कचेरीपर्यंत 'तिरंगा रॅली' काढली. या कार्यक्रमास अध्यक्ष सुरेशराव कोळकी, प्रभारी प्राचार्या सौ. वैशाली भिऊंगडे, संचालिका सौ. फिलॉन बारदेस्कर, प्रा. सौ. स्वाती कोरी, अनिल देशमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.