कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये महिला समानता दिवसाचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांनी या दिवशी महिलांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता वाढवली पाहिजे तसेच शिक्षण,आरोग्य, रोजगार यांसारख्या सर्व क्षेत्रांत महिलांना समान संधी मिळायला हव्यात असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रेश्मा खाडे व कृष्णात स्वाती उपस्थित होते. मार्गदर्शन करताना रेश्मा खाडे यांनी महिलाना समान संधी दिली पाहिजे. रोजगार, शिक्षण यामध्ये महिलांनी अग्रेसर राहिले पाहिजे. विकसित अर्थव्यव्येसाठी लैंगिक समानता महत्त्वाची आहे असे नमूद केले तर कृष्णात स्वाती यांनी अंधश्रद्धेबद्दल समाजात जनजागृती करणे,अंधश्रद्धांमुळे होणारे नुकसान आणि लोकांचे शोषण थांबवणे व समाजाच्या विकासात सक्रियपणे योगदान देणे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.ऋचा आष्टेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सुषमा शिंदे तर आभार प्रदर्शन प्रा. निकिता शेटे यांनी मानले.