कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना पंधरा दिवसांचा अवधी
कोल्हापूर : दिनांक 13 मे 2025 च्या शासन निर्णयातील 7.6 प्रमाणे स्कूल बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शाळा व्यवस्थापकांना बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील स्कूल बस साठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 15 दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील शाळा व स्कुल बसचे मालक यांनी स्कूल बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे दिनांक 14 सप्टेंबर पर्यंत बसवून घ्यावे, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी केले आहे.