गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात अत्यंत अवघड व जिकीरीचे शस्त्रक्रिया मायक्रोस्कोपीद्वारे कोल्हापूर नंतर प्रथमच ग्रामीण भागात शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तसेच ही शस्त्रक्रिया कर्नाटका सुवर्ण योजनेतून मोफत केली असल्याची माहिती डॉ. यशवंत चव्हाण यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी कर्नाटकातील 25 वर्षे युवती येथे तपासणी करता आले असता एमआरआयच्या चाचणीद्वारे मेंदूचा गाभा, चेहरा व गिळण्याच्या नसा शेजारी गाठ असल्याचे निष्पन्न झाले. जन्मताच असलेली गाठ वयोमानानुसार वाढत गेली, परिणामी त्याचा त्रास जाणवू लागला. येथील डॉक्टरांच्या टीमने रुग्णाचे जीव वाचवायच्या उद्देशाने शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले व तब्बल सहा तास शस्त्रक्रिया पार पडली. मायक्रोस्कॉपिकच्या सहाय्याने चिकटलेली गाठ काढण्यात यशस्वी ठरले आहे. यासाठी न्यूरोलॉजिस्ट डॉ.सागर जांभीलकर, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ.यशवंत चव्हाण, डॉ. रूपाली कोरी यांच्या टीमचे सहकार्य मिळाले.