Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यातील 'शक्तिपीठ'ला पर्याय तपासण्याचे आदेश

शक्तिपीठ रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील : कॉ.संपत देसाई




आजरा (हसन तकीलदार): कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाला कोणते पर्याय आहेत, त्या पर्यायांची तपासणी करण्याचे आदेश अवर सचिव राजेश भोगले यांनी दिले आहेत. अशी माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉ. संपत देसाई यांनी दिली आहे.

     


शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून आमदारसतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, मोर्चे काढीत तिव्र विरोध करण्यात येत आहे. जनतेतून मागणी नसताना, दळणवळणासाठी पर्यायी महामार्ग उपलब्ध असतानासुद्धा राज्याच्या 12जिल्ह्यातून होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी मागील आठवड्यात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख  प्रा. सुनील शिंत्रे, श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात मोर्चा काढण्यात आला होता. या अगोदर शक्तिपीठामुळे ज्या शेती उध्वस्त होणार आहेत त्या शिवारातून "तिरंगा आमच्या रानात" या माध्यमातून शिवारात तिरंगा फडकवून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्यामधून जमीन आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढण्याची शेतकऱ्यांची जिद्द दाखवून दिली होती. शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखालील लढ्यामुळे सरकारला मूळ रस्त्याची आखणी बदलायला भाग पाडले आहे. हा शेतकऱ्यांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विजय आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा शक्तिपीठ रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे कॉ. संपत देसाई यांनी सांगितले.


आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आले आहे की, मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955च्या कलम 3 व कलम 15(2)ची अधिसूचना दि. 15/10/2024 रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आली आहे. तदअनुषंगाने कोल्हापूर जिल्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणीचे सर्व उपलब्ध व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून शासनास सादर करावे.असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.