आजरा अन्याय निवारण समिती आणि त्रिमूर्ती चॅरिटेबल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
आजरा (हसन तकीलदार) : आजऱ्याचे सामाजिक सुधीर उर्फ बापू कुंभार यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आजरा अन्याय निवारण समिती आणि त्रिमूर्ती चॅरिटेबल फाउंडेशन यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
सुधीर (बापू )कुंभार हे पूर्वीपासूनचे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. या अगोदरही त्यांनी भाजपच्या पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. सामाजिक प्रश्न असो अथवा राजकीय प्रश्न सक्रिय सहभाग घेऊन त्या प्रश्नांना योग्य पद्धतीने हाताळण्याची त्यांची हातोटी आहे. आता भाजपने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. कोल्हापूर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदी त्यांची निवड झाल्याबद्दल आजरा अन्याय निवारण समिती व त्रिमूर्ती चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी सुधीर कुंभार म्हणाले, माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने कोल्हापूर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास दर्शविला त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. या पदाला पूर्णपणे व योग्य न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. निवड झाल्याबद्दल सर्वांनी येऊन मला पाठबळ दिले, माझा सत्कार केला त्याबद्दल सर्व मित्रपरिवाराचे मी मनापासून धन्यवाद मानतो. पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निश्चितच मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन असे त्यांनी सांगितले.
यावेळी अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे, त्रिमूर्ती चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णराज आयर, उपाध्यक्ष किशोर नाईक, वाय. बी. चव्हाण, जोतिबा आजगेकर, जावेदभाई पठाण, करामतअली शेख उपस्थित होते.