कोल्हापूर : येथील, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक सद्भावना दिवसाचे औचित्य साधून आदिवीर जनाधार फाउंडेशन व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये कॉलेजचे प्राचार्य.डॉ.रवींद्र कुंभार यांनी हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. "सद्भावना" म्हणजे "चांगले विचार" किंवा "सौहार्द". या दिवशी, लोकांमध्ये जातीय आणि धार्मिक सलोखा वाढावा असे नमूद केले यावेळी आदिवीर जनाधार फाउंडेशनचे प्रशिक्षक रमेश के.पाटील यांनी जागतिक सद्भावना दिवसाचे महत्व आणि महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना सक्षम बनवणे, त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य देणे आणि समाजाच्या विकासात समान संधी देणे. याचा अर्थ, महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक संधींमध्ये समान प्रवेश मिळवून देणे, ज्यामुळे त्या स्वतःच्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकतील आणि समाजाच्या विकासात सक्रियपणे योगदान देऊ शकतील याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमचे प्रास्ताविक आणि पाहुण्याची ओळख प्रा.निकिता शेटे यांनी करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आरती माने व आभार प्रदर्शन प्रा.सोनाली नाईक यांनी केले.