नांगनूर: सुशोभीकरण करण्यात येणाऱ्या तलावाची पाहणी करताना ग्रा.पं. प्रशासक राजन दड्डीकर, एस. बी.पाटील, बाळकृष्ण रावण, रामकृष्ण शेंडे.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नांगनूर येथील थोरल्या माळातील जुन्या तलावाचे सुशोभीकरण होणार आहे .या तलावाची ग्रा. पं . प्रशासक राजन दड्डीकर व सहयोग ग्रुपच्या सदस्यांनी नुकतीच पाहणी केली. दड्डीकर यांनी ग्रुपने केलेल्या वृक्षारोपणाची व संवर्धनाची पाहणी करून कौतुक केले. नजीकच्या काळातील ग्रुपच्या संकल्पांची चर्चा केली. यावेळी दड्डीकर यांनी ग्रामपंचायतीमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
थोरले माळ या ठिकाणी जुना तलाव आहे .या तलावातील गाळ, खडी काढण्याचे काम प्रस्तावित आहे. तलावा भोवती जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांना विसाव्यासाठी बाकडी आदी सुविधा होणार आहेत .सहयोग ग्रुपने सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, हितचिंतक, समाजातील दातृत्ववान व्यक्ती यांच्या सहकार्यातून हे काम पूर्णत्वास नेण्याचे निश्चित केले आहे. यावेळी राजन दड्डीकर, एस. बी. पाटील, बाळकृष्ण रावण, रामकृष्ण शेंडे आदी उपस्थित होते.