अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण
आजरा (हसन तकीलदार) : येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी कारखान्यात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्याच्या सुरक्षा विभागामार्फत परेड संचलन पार पडले.
या कार्यक्रमासाठी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, संचालक गोविंद पाटील, तज्ञ संचालक हाजी रशीद पठाण, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, एच्.आर. मॅनेजर सुभाष भादवणकर , सिव्हिल इंजिनिअर शंकर आजगेकर, डे.चिफ अकौंटंट रमेश वांगणेकर, सुरक्षा अधिकारी जगदीश देसाई, ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई, तसेच अन्य खाते प्रमुख, उपखाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.