आजरा(हसन तकीलदार) : आजरा शाखा महावितरण तर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेची त्याचबरोबर या अंतर्गत असणाऱ्या योजना व सबसिडीची माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी आजऱ्याच्या मुख्य रस्त्यावरून प्रचार व जागृती फेरी काढण्यात आली. विजग्राहकांना सौर ऊर्जेचे महत्व तसेच यामध्ये असलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी हा या फेरीचा मुख्य उद्देश होता.
सकाळच्या सत्रात महावितरण कार्यालयापासून तहसील कार्यालय तसेच आजरा एस. टी. स्टॅंड येथे सौर वीज योजनांची माहिती असणारे फलक घेऊन माहिती देत प्रचार फेरी सुरु झाली. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद आष्टेकर यांनी माहिती देताना म्हणाले की, सौर कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी 27 हजार कोटी रुपयांची कृषी पंप योजना आहे. 10 टक्के रक्कम भरून सोलर पॅनलसह पंप उपलब्ध होतो.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 65 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 70 हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. कृषी फिडर्स सौर उर्जेवर चालवीणार आणि सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीज तयार करता येते. 300 युनिट पर्यंत वीजबिल शून्य तसेच जादा असलेली वीज विकून उत्पन्नाचीही संधी यामध्ये आहे. केंद्र सरकारकडून 78 हजार रुपयापर्यंत भरघोस अनुदान मिळणार आहे. ही योजना महाविरणाच्या घरगुती ग्राहकांसाठी आहे तसेच विविध बँकाकडून सवलतीच्या व्याजदरात कर्जाची सोयही उपलब्ध होणार असले बाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.
यावेळी सोहम ग्रीन एनर्जीच्या संचालिका सोनिया शिंदे यांनी सौर ऊर्जेच्या पॅनल, वापर व दरा विषयी माहिती दिली आणि आपल्या गडहिंग्लज येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती व लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी कृष्णात कोळी (सहाय्य्क अभियंता), दीपक माने (सहाय्य्क अभियंता), सुशांत शिंदे (सहाय्य्क अभियंता), शरवरी शिंदे (कार्यलयीन अभियंता),संतोष डोंगरे (लाईनमन), सुनील पाटील, विनोद कांबळे, बाळकृष्ण कडुकर, प्रथमेश कातकर, तेजस पाटील, प्रदीप हुंदळेकर, नीता गायकवाड, श्रावण कांबळे, इम्रान हवालदार, इम्रान अत्तरवाले, सादिक देसाई, तबस्सूम दरवाजकर, उवैस दरवाजकर, दिलीप कोरवी, भगवान धुरी, सागर माने, शिवाजी तर्डेकर, रोहित शेंडे, लहू कापडूस्कर, रामा बेडगे, राजू कुंभार अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतला.