माजी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे "बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री "ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण सोहळा माजी आमदार राजेश पाटील व सरपंच सौ. रेखा लाटकर यांच्या हस्ते उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोडसाखर चे माजी संचालक ॲड. बाळासाहेब पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण, गोड साखरचे माजी संचालक महाबळेश्वर चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक ॲड. संजय देसाई यांनी केले. यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी जयसिंगराव चव्हाण, महाबळेश्वर चौगुले, ॲड. बाळासाहेब पाटील, माजी सरपंच उदयकुमार देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. आभार ग्रामपंचायत अधिकारी विकास मोटे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी अभय देसाई अडकूरकर, लक्ष्मण तोडकर, भरत पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण शिंदे, तुषार भोसले, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर राजू कलकुटगी, माजी उपसरपंच दत्ता मगदूम, ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.