गडहिंग्लज (प्रतिनिधी): "करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे" या साने गुरुजींच्या विचारांप्रमाणे आयुष्यभर शिक्षण क्षेत्राची निष्ठेने सेवा बजावणाऱ्या साधना बालवाडीच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वहिदा दस्तगीर शेख या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळा साधना विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर तर संस्थापक सचिव प्राचार्य जे. बी.बारदेस्कर हे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून साधना हायस्कूलचे माजी प्राचार्य आर.एन. पटेल, साधना शिक्षण संस्थेचे संचालक अरविंद बारदेस्कर, माजी नगराध्यक्षा प्रा. सौ.स्वाती कोरी, शिवराज संकुलाचे दिग्विजय कुराडे, साधना प्रशालेचे प्राचार्य आय. पी. कुटिन्हो, व्होकेशनलचे विभाग प्रमुख अनिल देशमुख, विज्ञान विभाग प्रमुख रामराव लांबोर तसेच साधना कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या वैशाली भिऊगडे यांची उपस्थिती लाभली. अध्यक्ष श्री. गुजर, सचिव जे .बी. बारदेस्कर व मान्यवरांच्या शुभहस्ते वाहिदा शेख यांचा सत्कार करण्यात आला.
संचालक अरविंद बारदेस्कर, प्राचार्य आय पी. कुटिन्हो, फारुख ठगरी, माजी प्राचार्य पटेल, विश्वनाथ धूप, .शुभांगी कुंभार, गणपतराव पाटोळे, अरुण हावळे व निलोफर शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक साधना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी देसाई यांनी केले. सूत्रसंचालन राणी कोरी व संजना जाधव यांनी केले तर आभार रॉबर्ट बारदेस्कर यांनी मानले.
समारंभासाठी हारुण सय्यद , बाळेश नाईक, उदय कदम , सौ. उज्वला दळवी, रशिदा शेख, साधना हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.