25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सातारा येथे पार पडणार प्रक्रिया
कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा राज्यातील युवकांना संधी
कोल्हापूर : पुणे भरती कार्यालयाअंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा राज्य या जिल्ह्यातील नव युवकांसाठी भारतीय सैन्य दलामध्ये अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया दिनांक 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा मैदान, सातारा येथे होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ऑनलॉईन पध्दतीने www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर किंवा संदर्भित जिल्हा भरती कार्यालयमध्ये प्रत्यक्ष चौकशी करु शकता, असे डॉ. चवदार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.