शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ८५ रुग्णांची नेत्र तपासणी
आजरा तालुका चिटणीस शकील मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
आजरा (प्रतिनिधी): ठाकरे युवा सेनेचे आजरा तालुका चिटणीस शकील मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर बहिरेवाडी येथे पार पडले. या शिबिराला ग्रामस्थांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ८५ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उदघाटन युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) प्रमुख अवधूत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी युवासेना गडहिंग्लज तालुकाप्रमुख सागर हेब्बाळे, उप तालुकाप्रमुख विशाल पाटील, आजरा तालुका युवा सेना प्रमुख रोहित डावरे, उपतालुकाप्रमुख सचिन पाटील, उत्तुर शहर प्रमुख संतोष कांबळे, गडहिंग्लज शहर प्रमुख सुमित कोरवी, उपशहर प्रमुख राज कोरवी, गडहिंग्लज विभाग प्रमुख तेजस घेवडे यांच्यासह युवा सैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.