गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या दि गडहिंग्लज अर्बन बँकेत जागतिक सहकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
बँकेचे चेअरमन जितेंद्र नाईक यांच्या हस्ते सहकार ध्वज फडकविण्यात आला. चेअरमन श्री. नाईक यांनी सहकाराबद्दल माहिती देवून सहकाराची आजच्या काळातील गरज व सहकारामुळे समाजातील सामान्य नागरीकांचा तसेच तळागाळातील अविकसित समाजाचा कसा विकास साधता येतो याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी व्हाईस चेअरमन एन एम कोल्हापुरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब हिरेमठ, प्रा.रमेश पाटील, सुभाष पुजारी, राजू हत्ती, विलास रामनकट्टी, तज्ञ संचालक प्रितम कापसे, ज्येष्ठ संचालिका श्रीमती शारदा आजरी, कर्ज विभागाचे प्रमुख संजय पाटील, शाखा व्यवस्थापक प्रमुख संजय गाडे, बँकेचे स्थावर व्हॅल्यूअर चंद्रकांत सावंत, सीए विजय बोरगल्ली, ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.
नुकतेच गडहिंग्लज अर्बन बँकेस वर्ष 2024 25 या सालासाठी वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून ऑडिट वर्ग अ प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेची प्रगती निश्चितच उल्लेखनीय व आदर्शवत आहे.