महागावच्या महात्मा फुले विद्यालयात सवलत पास वाटप कार्यक्रम
![]() |
महागाव : येथे सवलत पास वाटप कारताना आगर व्यवस्थापक गुरुनाथ रणे, संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील, निलप्रभा पाटील,शितल गुरव,मोहन कांबळे, विक्रांत खोत, चंद्रकांत कोष्टी होते.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): एसटी आणि शाळा यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. ग्रामीण भागातील मुली शिकाव्यात, शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांना शाळेतच पास देण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहे. त्या आदेशानुसार परिवहन विभागाकडून शाळेत पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.जेणेकरून विद्यार्थ्यांना पाससाठी बस स्थानकाच्या रंगीत तासनतास थांबून अध्ययनात अडचणी येणार नाही. त्यामुळे मुलांना ६६ टक्के सवलतीचे व मुलींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सवलत पास योजनेतून मोफत पास दिला जात आहे. यासह इतर योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांनी केले.
महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सवलत पास योजनेतून मोफत पास वाटप कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील होते. प्रमुख उपस्थित जिल्हा सहा. वाहतूक अधिक्षक निलप्रभा पाटील,शितल गुरव, वाहतुक नियंत्रक विक्रांत खोत, चंद्रकांत कोष्टी,पर्यवेक्षक मोहन कांबळे होते.
प्रास्ताविक प्रकाश चौगुले यांनी केले. यावेळी जिल्हा सहा. वाहतूक अधिक्षक निलप्रभा पाटील विद्यार्थांना एसटी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती सांगत आपल्या सुरक्षित प्रवासासाठी एसटीनेच प्रवास करण्याचे आवहन केले.दरम्यान मान्यवरांच्या हस्ते बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना सवलत पासचे वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा. मुकुंद मांडरे यांनी तर रमेश कळविकट्टे यांनी आभार मानले. यावेळी अशोक नांदूलकर,सुभाष सुतार, महेश पाटील,संदेश कोकितकर, कुलदिप देसाई, किरण पाटील, शांताराम वागराळीकर, शिवाजी सुतार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.