लेझीम पथक, एन.सी.सी. कॅडेट परेड व माजी शिक्षकांच्या उपस्थितीत जल्लोषी स्वागत
ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी
गडहिंग्लज (महादेव तुरंबेकर) : येथील साधना प्रशालेचे संस्थापक गुरुवर्य जे. बी. बारदेस्कर यांचा 86 वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी लेझीम पथक, एन.सी.सी. कॅडेट परेड व माजी शिक्षकांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.
साधना शिक्षण संस्था प्रमुख जे. बी. बारदेस्कर यांचा सत्कार साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर व शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य आय.पी. कुटिन्हो यांनी केले. मनोगतातून प्रा. किसनराव कुराडे यांनी जे. बी. बारदेस्कर यांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी मनोगतातून शिक्षणतज्ज्ञ जे. बी. बारदेस्कर यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाची माहिती दिली. अध्यक्ष चंद्रकांत गुजर, सुरेश कोळकी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विद्याधर गुरबे, राजन पेडणेकर, नागेश चौगुले, कावेरी चौगुले, अनिता डिसोजा, संचालिका सौ. फिलॉन बारदेस्कर, ॲड.दिग्विजय कुराडे, डॉ. एम.एस. बेळगुद्री, साताप्पा कांबळे, माजी मुख्याध्यापक रफिक पटेल, जी. एस. शिंदे, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, साधना परिवारातील शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल देशमुख, शिवाजी कुराडे यांनी केले. सूत्रसंचालन गणपतराव पाटोळे, जॉन्सन सोज, निलोफर शेख यांनी केले. संचालक अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.