कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी,(डिप्लोमा इन फार्मसी) चा 100 टक्के निकाल लागला असून प्रथम बॅच च्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा तर्फे उन्हाळी परीक्षा 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये विद्यार्थिनींनी उत्तम यश संपादन केले. यानिमित्त यशस्वी विद्यार्थिनींचा विशेष सत्कार आयोजित केला होता.
यावेळी द्वितीय व प्रथम वर्षातील विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी द्वितीय वर्षातील प्रथम क्रमांक कु.सिद्धी सुतार (83.82%), द्वितीय- कु.वैष्णवी सुतार (79.82%), तृतीय-कु.हर्षदा पाटील (79.55%), कु. सोनल वडणगेकर(79.82%) व निकत मुल्ला (75.18%) यांनी अनुक्रमे यश संपादन केले.
तर प्रथम वर्षातील कु.मृण्मयी मोरे (81.70%), कु.शिवानी भोसले (78.60%), कु.पायल लाड (77.40%), कु.अमृता तिवले(74.60%) कु. आरती माने (73.80%) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले.
या यशाचे मुख्य श्रेय संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा, अद्यावत लायब्ररी व सर्व सोयसुविधा आणि सतत मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक वर्गाला जाते असे प्राचार्य डॉ.रविंद्र कुंभार यांनी नमूद केले.
या निकालामुळे फार्मसी शिक्षणाचे दर्जात्मक स्थान अधोरेखित झाले आहे. संस्था केवळ शिक्षणापूर्ती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन डॉ. के.जी पाटील यांनी केले व विद्यार्थिनींना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा.पियुषा नेजदार यांनी पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.या विशेष सत्कार प्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन डी. जी. किल्लेदार,संचालक पी.सी. पाटील ,फार्मसी कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी यशस्वी विद्यार्थिनी मधून कु.आरती माने, कु.सोनल वडणगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ.पूजाश्री पाटील यांनी केले.