Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बसर्गे येथे दिनांक 9 जुलै रोजी सदृढ बैलजोडी स्पर्धा

महाराष्ट्रीय बेंदूर निमित्त स्पर्धेचे आयोजन


जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कमिटीचे आवाहन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्रीय बेंदूर निमित्त बसर्गे बुद्रुक येथे गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दिनांक 9 जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. महालक्ष्मी देवालय पटांगण या ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत. याचे संयोजन गावातील सर्व संस्था, मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे.



या स्पर्धा बिनदाती, दोन दाती, चार ते सहा दाती, बैलजोडी गट अशा वेगवेगळ्या चार गटांमध्ये होणार आहेत. या गटांमध्ये प्रथम क्रमांकास 10,001, द्वितीय क्रमांकास 7001, तृतीय क्रमांकास 5001, चतुर्थ  क्रमांक 2001 रुपये तसेच ढाल व निशाण देण्यात येणार आहे.




पंचवीस वर्षांपूर्वी बसर्गे गावात एकही बैलजोडी शेतकऱ्यांकडे नव्हती. त्यामुळे याचा विचार करून गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सदर सदृढ बैलजोडी स्पर्धा गेल्या 21 वर्षापासून भरवत आहेत. सदृढ बैलजोडी स्पर्धा भरवण्यासाठी 2004 साली कै. शंकरराव भीमराव थोरात, कै सहदेव बंडू नाईक, कै. मारुती आप्पा माने, कै. अमर काशाप्पा जाधव, कै.आनंदा आप्पांना नाईक यांनी सुदृढ बैलजोडी स्पर्धा कमिटीची स्थापना केली. आता या कमिटीत नारायण येडूरकर, भारत फडतरे, मारुती संकेश्वरी, सुभाष चौगुले, सुभाष मणिकेरी, रोहिदास वालकर, अशोक सुतार, लगमान्ना घुळानावर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कमिटी मार्फत  करण्यात आले आहे.



अधिक माहितीसाठी सुभाष चौगुले 7798 858 477, भारत फडतरे 8600 873 303, विनायक हसुरकर 9766 568 690, साहिल जाधव : 74100 60 379, विनायक नाईक 8530 538 104, राहुल नाईक : 9699 247 875 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कमिटी मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.