लायन्स क्लब, पोतदार नेचर क्यूअर क्लिनिक, गंधर्वा अकॅडमी, शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील लायन्स क्लब येथे अकरावा जागतिक योग व संगीत दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन पोतदार नेचर क्यूअर क्लिनिक, गंधर्वा म्युझिक अकॅडमी गडहिंग्लज, शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय बहिरेवाडी यांनी केले.
प्रास्ताविक व स्वागत लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुराज हत्ती यांनी केली. लायन्स ब्लड बँकचे अध्यक्ष अण्णासाहेब गळतगे, उपाध्यक्ष सुनील पटणशेट्टी, विनायक गळतगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी योग तज्ञ पोतदार नेचर क्युअर क्लिनिकचे संस्थापक डॉ. योगेश पोतदार व शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तूर येथील योग अध्यापक डॉ. ए. बी. स्वामी यांनी मार्गदर्शन केले.
बासरी व व्हायोलिन वादन गंधर्वा म्युझिक अकॅडमीच्या संस्थापिका संगीत विशारद डॉ. श्रुती पोतदार यांनी केले. कार्यक्रमाला लायन्स क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजेंद्र वडगुले यांनी मानले.