Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

किल्ले सामानगडावर बायोडायव्हर्सिटी पार्क साकारण्यासाठी प्रयत्न करू!

निडसोसी मठाचे जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांचे प्रतिपादन


स्वामीजींच्या वाढदिवसानिमित्त १ हजार १११ वृक्षांचे रोपण 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सामानगड किल्ल्यांवर तरस, मोर, भारद्वाज, गवीरेडे असे प्राणी असुन मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड करून जपानमधील प्रसिध्द मियावाकी रेन फॉरेस्टच्या धर्तीवर जैवविविधतेने परिपूर्ण "बायोडायव्हर्सिटी पार्क" (जैवविविधता उद्यान ) साकारण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन निडसोसी येथील श्री दुरदुंडेश्वर मठाचे मठाधिपती परमपूज्य जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले.



त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री काळभैरव माॅर्निंग वाॅक मंडळ व श्री बाळुमामा देवस्थान सेवा संस्थानने आयोजित केलेल्या एक हजार एकशे अकरा वृक्षांच्या रोपण प्रसंगी ते बोलत होते. गडहिंग्लजच्या श्री जडेयसिध्देश्वर आश्रम बेलबाग मठाचे श्री महंतसिध्देश्वर महाराज, रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती परमपूज्य भगवानगिरी महाराज, पतंजली योग विद्यापिठाचे महाराष्ट्र प्रभारी बापू,  गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती अमरसिंह चव्हाण, बाळुमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश रिंगणे, सचिव चंद्रकांत सावंत, काशिनाथ शेट्टी, माजी नगरसेवक बाळासाहेब गुरव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हनुमान मंदिराजवळ वृक्षारोपण करण्यात आले.



कार्यक्रमास वन अधिकारी रमेश कोळेकर, हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे, राजु हंजी, डॉ घाळी शिक्षण संस्थेचे संचालक विकास पाटील, मैत्रांगण संस्थेच्या अनिता पाटील, शिवराम सितामाई ट्रस्टचे विश्वस्त इंजिनिअर के.टी. शेलार, गोड साखर संचालक दिग्विजय कुराडे, शिवाजीराव पाटील जरळीकर, डॉ. क्षिरसागर, सदाशिव कावणेकर, महेश तुरबतमठ, नितिन पाटील शिजवणे, अजित बंदी, जवाहर घुगरे, भिमराव पट्टणकुडी, चंद्रशेखर खापणे, धिरज इंगवले, राजेंद्र गुरव, ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, राजु खमलेटृटी, सुभाष चोथे, बसवराज आजरी, गोड साखरचे माजी संचालक रमेश आरबोळे, वन अधिकारी कोळेकर, आप्पासाहेब बस्ताडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.