Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथे ठाकरे शिवसेनेचे चार उपशहर प्रमुख, एक शाखा प्रमुखाचा मनसेत जाहीर प्रवेश



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  गडहिंग्लज येथे ठाकरे शिवसेनेचे चार उपशहर प्रमुख, एक शाखा प्रमुख यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले.



जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वावर व कोल्हापूर जिल्हा ग्रामीण तसेच गडहिंग्लज तालुक्यातील शहरातील सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन मनसेत आपण प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.


प्रवेश केलेल्यांमध्ये ठाकरे शिवसेना  गटाचे उपशहर प्रमुख संदिप चव्हाण, गजाभाऊ सासणे, अनिल खानाई, काशिनाथ हालसोडे, शाखाप्रमुख नागेश हुलसार, दीपक दावणे, अशोक करडे यांचा समावेश आहे. 


यावेळी शहर अध्यक्ष केंपान्ना कोरी, मनविसे जिल्हा अध्यक्ष प्रभात साबळे, उप तालुका अध्यक्ष अजिम पठाण, तालुका उपाध्यक्ष करण गुलगुंजी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.