Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज - चंदगड राज्यमार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू ; वाहनचालकांतून समाधान



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम संबंधित विभागाने आज पासून घेतल्याने वाहन चालकातून समाधान व्यक्त होत आहे.  दोन दिवसापूर्वी हुनगिनहाळ - हरळी बुद्रुक या दरम्यानचा धोकादायक  खड्डा हरळी खुर्द येथील युवकांनी स्वखर्चातून बुजवले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.



गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्ग हा  गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांसह बेळगाव, गोव्याला जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. हा राज्यमार्ग गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे.  या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहतूक करणे धोक्याचे ठरत होते. रात्रीच्या वेळी तर वाहन चालकांना मोठ्या सतर्कतेने जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत होती. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना देखील घडल्या होत्या.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.