गडहिंग्लजला संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या जीवनात आयुष्यभर हे मूल्य आणि संस्कार महत्त्वाचे ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवण्यासाठी कष्ट घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी चांगली स्वप्ने पाहायला शिकले पाहिजे. त्या स्वप्नांच्या व ध्येयाच्या पुरतेसाठी कष्ट केलेच पाहिजे. आपल्या करिअरला घडविण्यासाठी आजच्या स्पर्धेच्या जगात कष्टाशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक असे प्रतिपादन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केले.
येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमधील बारावी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स परीक्षेतील उत्तीर्ण व एम.एच.सीईटी २०२५ मधील गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.तानाजी चौगुले यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार श्री. शेळके यांनी विद्यार्थ्यांनी किती मार्क्स मिळविले याच्यापेक्षा माणूस म्हणून घडणे आवश्यक आहे. आई वडील गुरुजनांचा आदर करा. आपल्या इच्छेनुसार करिअर करा. शिक्षणाच्या कक्षा आता फार रुंदवलेल्या आहेत. विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बारावी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स परीक्षेतील उत्तीर्ण व एम.एच.सीईटी २०२५ मधील विद्यार्थ्यांचा सत्कार तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी शिवराज हे आदर्श जपणारे महाविद्यालय आहे. बहुजनांची मुले शिकली पाहिजे यासाठी शिवराज विद्या संकुल सतत कार्यरत असते. विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या व गुरुजनांच्या सानिध्यात राहून आपले करिअर घडवले पाहिजे असे स्पष्ट करून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पर्यवेक्षक प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालक इंचनाळच्या माजी सरपंच सौ. आशाताई पोवार, महादेवी उंबरे, विद्यार्थी संध्या धुमाळ, वेदांती पालकर, आदित्य उंबरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी पूजा खवरे, गौरी गोंदुकुप्पे, वेदांत देसाई, श्रुतिका पाटील, सोहन जोशीलकर (सायन्स), आदित्य गावडे, प्रांजळ पाटील, ओम चौगुले, कुणाल चौगुले, आदर्श पाटील, नेत्रा गावडे, रेश्मा पाटील(एम.एच.सीईटी), मधुर देसाई, वेलांकिनी मांगले, आर्या मोरे (इंग्लिश कॉमर्स), संध्या धुमाळ, प्रतीक्षा गुरव, वेदांती पालकर, रेहान पठाण, आदित्य उंबरे (आर्ट्स) रिया वाघे, प्रतीक्षा कांबळे, संजना मेने,ऋतुजा पाटील, ओमकार नावलगी (मराठी कॉमर्स) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शिवराज इंग्लिश मेडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ए.बी.पाटील, ज्युनिअरचे सर्व शिक्षक, यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा-आशा पाटील,प्रा. विद्या पाटील यांनी केले तर आभार विना-अनुदानित ज्युनिअर सायन्स विभाग प्रमुख प्रा.एस.पी.कुराडे यांनी मानले.